गुंतवणूक केलेले पैसे सुरक्षित राहावेत आणि भविष्यात योग्य रक्कम मिळावी अशी प्रत्येक गुंतवणूकदाराची अपेक्षा असते. यासाठी अनेक पर्याय निवडले जातात. याचा विचार करून सध्या पोस्टाने पोस्ट ऑफिस डिपॉझिट योजना सुरू केली आहे.

तुम्ही जर गुंतवणुकीचा विचार करत असाल तर या योजनेत गुंतवणूक केलेली रक्कम निश्चित वेळेत दुप्पट होते आणि सुरक्षितही राहते. सध्या या योजनेला ग्राहकांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला आहे.
ग्राहकांच्या गुंतवणुकीवर बँकांपेक्षाही जास्त व्याज दिलं जात आहे. सरकार या योजनेतंर्गत ७.५ टक्के व्याज देत आहे. वेगवेगळ्या कालावधीसाठी गुंतवणूक करता येऊ शकते. एका वर्षाच्या गुंतवणुकीवर ६.९ टक्के व्याज, २ आणि ३ वर्षांसाठी ७ टक्के आणि ५ वर्षाच्या गुंतवणुकीवर ७.५ टक्के व्याज मिळणार आहे. मात्र, गुंतवणूक केलेली रक्कम दुप्पट होण्यासाठी ५ वर्षांपेक्षा अधिक कालावधी लागतो.
पोस्ट कार्यालयात या योजनेंतर्गत १० वर्षांपेक्षा जास्त वयाच्या मुलाचं खातं उघडता येतं. किमान १ हजार रुपयांमध्ये सिंगल किंवा जॉईंट अकाउंट उघडता येतं. या खात्यात जमा केलेल्या रकमेवर व्याजाची रक्कम वार्षिक आधारावर मिळणार आहे.

गुंतवणूक केलेल्या रकमेवर ७. ५ टक्के व्याज मिळणार आहे मात्र जर टाईम डिपॉझिट योजनेत गुंतवणून केली तर अधिक परतावा मिळणार आहे. ही रक्कम ११४ महिन्यांनी म्हणजेच ९. ६ वर्षांनी दुप्पट होईल. या योजनेत गुंतवणूक केलेल्या ग्राहकांना भारत सरकारकडून आयकर विभागामार्फत सवलतीही देण्यात येणार आहेत.

Post Office Saving Schemes

पोस्ट खात्याची जबरदस्त “ज्येष्ठ नागरीक बचत योजना” मिळेल 2 लाखांचे व्याज, इतकी करावी लागेल गुंतवणूक

ज्येष्ठ नागरीक बचत योजना : उतारवयात शरीर थकते आणि खर्च वाढतो. अशावेळी अगोदर केलेली गुंतवणूक तुमच्या फायद्याची ठरु शकते.ज्येष्ठ नागरीक बचत योजनेत जबरदस्त परतावा मिळतो. सध्या या योजनेवर 8.2 टक्के व्याज मिळते. या व्याजदरात केंद्र सरकार दर तीन महिन्यांनी आढावा घेऊन त्यात बदल करते. ही योजना सर्वांसाठी फायदेशीर आहे. या योजनेत दोन लाखांचे व्याज मिळू शकते.

ज्येष्ठ नागरिक बचत योजना

▪️एकदाच जमा करा 5 लाख रुपये
▪️ही रक्कम पाच वर्षांसाठी जमा करा
▪️या रक्कमेवर 8.2 टक्के व्याज मिळेल
▪️मॅच्युरिटीची एकूण रक्कम 07,05,000 रुपये होईल
▪️व्याजाची रक्कम 2,05,000 रुपये असेल
▪️तिमाहीत ही रक्कम 10,250 रुपये होईल

या योजनेचा फायदा काय?

▪️ही केंद्र सरकारची योजना आहे. यातील गुंतवणूक सुरक्षित आहे. केंद्र सरकारची त्याला हमी मिळेल.

▪️आयकर खात्याच्या नियम 80C अंतर्गत गुंतवणूकीवर वार्षिक 1.5 लाख रुपयांपर्यंत कर सवलतीचा लाभ मिळेल.

▪️पोस्ट खात्याच्या या योजनेचे खाते देशभरातील कोणत्याही पोस्ट ऑफिसमध्ये हस्तांतरण करता येईल. या योजनेत दर तीन महिन्याला व्याजाची रक्कम जमा करण्यात येते.

खाते कसे उघडाल?

या योजनेत कोणत्याही पोस्ट खात्यात, सरकारी वा खासगी बँकेत खाते उघडता येईल. त्यासाठी एक अर्ज भरुन जमा करावा लागेल. या अर्जासोबत दोन पासपोर्ट फोटो, ओळखपत्र आणि इतर केवायसी कागदपत्रे जोडावे लागतील